Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

ओमिक्रॉनचा BA.2 सब-व्हेरिएंटचा ‘ट्रिपल अॅटेक’; राज्यातील करोनाच्या रुग्ण वाढीचे कारण समोर

मुंबईः राज्यात करोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात बी.ए ४ व्हेरियंटचे रुग्णही वाढताना दिसत आहे. आत्तापर्यंत राज्यात बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. करोना संसर्गाचा धोका असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन बीए. २ या सबव्हेरियंचे आणखी तीन उपप्रकार आढळले आहेत.

बीए.२ सबव्हेरियंटचे BA.2.74, BA.2.75 आणि BA.2.76 हे ओमिक्रॉनच्या BA.5 पेक्षा अधिक संसर्गजन्य आहेत. याचा प्रसार वेगाने होते, अशी माहिती इन्साकॉग SARS COVID-Two Genomics Consortiumच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी दिली आहे. तसंच, या सबव्हेरियंटमुळेच करोनाचा झपट्याने प्रसार होत आहे. जूनमध्ये करोनाचा वाढत्या आलेखामागे BA.2.38 हा व्हेरियंट कारणीभूत होता, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

मागील दहा दिवसांपासून २९८ रुग्णांना BA.2.76ची लागण झाल्याची माहिती आहे. तर, २१६ प्रकरणे ही BA.2.74 व ४६ प्रकरणे BA.2.75 या विषाणूची होती, असं एका अहवालात समोर आलं आहे. BA.2.75 हा विषाणू जपान, कॅनडा आणि युनायटेड स्टेटमध्येही वेगाने वाढत असल्याचं निरिक्षण शास्त्रज्ञांनी केलं आहे. या विषाणूचे म्युटेशन होत असल्याने तो थेट मानवी शरिरावर हल्ला करतो. त्यामुळं रोगप्रतिकारशक्तीवार त्याचा थेट परिणाम होतो, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि जम्मू काश्मीरमध्ये BA.2 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. जानेवारीमध्ये BA.2चा प्रसार वेगाने होत होता. जानेवारीमध्येच BA.2मुळं तिसरी लाट आली असल्याची शक्यता असली तरी जुनमध्ये पुन्हा त्याचा प्रसार कसा झाला हा संशोधनाचा विषय आहे. जूनमध्ये BA.2.75चे अधिक रुग्ण आढळून आले. त्यात ८० म्युटेशन झालं आहे. तर, BA.2चे ६० वेळा म्युटेशन झालं आहे. या विषाणूचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी BA.2चे परीक्षण केले त्यावेळेस BA.2.74 BA.2.75, BA.2.76 हे करोनाचे उपप्रकार आढळले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button