breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराष्ट्रिय

इजिप्तमध्ये कालव्यात बस कोसळून 22 प्रवाशांचा मृत्यू

डकहलिया । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।

इजिप्तच्या उत्तर डकहलिया प्रांतातील मिस्रमध्ये बसच्या भीषण अपघात 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याने 22 प्रवाशांचा मृत्यू झाला. इजिप्तच्या उत्तर डकहलिया प्रांतातील मिस्रमध्ये बसच्या भीषण अपघात 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याने 22 प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच, या घटनेमध्ये 7 जण जखमी झाल्याची माहिती मिळते.

इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत बस ही महामार्गावरून घसरुन मन्सौरा कालव्यात पडली. बस कालव्यात पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सुरक्षारक्षकांनी धाव घेत बचाव कार्याला सुरूवात केली. त्यानंतर घटनास्थळी 18 रुग्णवाहिका दाखल झाल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. तसेच, या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 6 महिला आणि 3 मुलांचाही समावेश आहे. या बसमध्ये एकूण 46 प्रवासी होते. बसमध्ये प्रवाशांबरोबर काही विद्यार्थीही होते. त्याचबरोबर या घटनेची माहिती मिळताच सरकानं मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मंत्रालयाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 100,000 इजिप्शियन पौंड मदतीची घोषणा केली आहे.

दरम्यान, इजिप्तमध्ये रस्ते अपघात नेहमीच होत असतात. इजिप्तमध्ये दरवर्षी हजारो लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागतो. गेल्या महिन्यात इजिप्तच्या नाईल डेल्टामध्ये मिनीबस आणि लॉरी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, 9 जण जखमी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button