breaking-newsआंतरराष्टीय

21 वे शतक आशियाचे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सिंगापूर – 21 व्या शतकात आशियासमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, 21वे शतक आशियाचे शतक असेल. आपण स्वत:वर विश्वास ठेवणे आणि आता ही माझी वेळ आहे हे समजून घेणे आवश्‍यक आहे. प्रसंगानुरूप आपण स्वत:ला सिद्ध करत नेतृत्व स्वीकारावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

सिंगापूरमधील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर थेट संवाद साधला.

पंतप्रधानांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबरोबर अलिकडे झालेल्या भेटीचे उदाहरण दिले. या भेटीत राष्ट्रपती शी यांना आपण कागदपत्रे दिली, ज्यात असे आढळते की गेल्या दोन हजार वर्षांपैकी 1600 वर्षे जागतिक स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारत आणि चीनच्या संयुक्त वाटा 50 टक्‍क्‍यांहून अधिक राहिला आहे. कोणत्याही संघर्षाशिवाय हे साध्य झाले आहे. संघर्षाशिवाय संपर्क वाढवण्यावर आपण भर द्यायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले.

सुशासनात अंतराळ तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. सामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याची क्षमता यात आहे. आपल्या पायाभूत विकासाचे योग्य नियोजन करण्यात (शाळा, उत्तम रस्ते, रुग्णालये यांसारख्या) अंतराळ तंत्रज्ञान आपल्याला मदत करते, असे पंतप्रधान म्हणाले.

परंपरा आणि जागतिकीकरणातील समतोलाबाबत प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, नाविन्यपूर्ण संशोधन, नीतीमूल्य आणि मानवतावादी मूल्यांच्या माध्यमातून मानवाने प्रगती केली आहे. मानवाच्या सर्जनशीलतेला तंत्रज्ञान सहाय्य करते. विविध समाजमाध्यम मंचांनी लाखो व्यक्तींना आवाज दिल्याचे ते म्हणाले.

चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगात सर्वसमावेशक विकास सुनिश्‍चित करण्याबाबत पंतप्रधान म्हणाले की, विस्कळीतपणा म्हणजे विनाश नव्हे. तंत्रज्ञान लोकांना सक्षम करते आणि तंत्रज्ञानाभिमुख समाज सामाजिक अडथळे पार करतो. तंत्रज्ञान परवडण्याजोगे आणि वापरायला सोपे असायला हवे. तसेच सुरुवातीला संगणकाबाबत लोक साशंक होते. मात्र संगणकांनी आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात मदत केली, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button