breaking-newsआंतरराष्टीय

जर्मनीतील प्राणी संग्रहालयातून वाघ-सिहांचे पलायन

ल्युएनबक (जर्मनी) – जर्मनीच्या ल्युएनबक प्राणी संग्रहालयातून काही प्राण्यांनी पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्राण्यांमध्ये दोन सिंह, दोन वाघ आणि एका जाग्वारचा समावेश आहे. (जाग्वार हा मध्य अमेरिकेतील चित्त्यासारखा प्राणी आहे.) हे प्राणी मोकाट सुटल्याने शहरातील नागरिकांनी घरातच राहावे अशा सूचना अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिल्या असून पळून गेलेल्या प्राण्यांपैकी कोणताही प्राणी दृष्टीस पडल्यास ताबडतोब पोलीसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

पिंजऱ्यातून पळून गेलेले प्राणी हे प्राणिसंग्रहालयाच्या आवारातच आहेत, की शहरात पसरले आहेत हे समजू शकलेले नाही.

रात्री आलेल्या वादळा आणि पुरामुळे पिंजऱ्यांत पाणी भरले आणि त्यांची मोडतोड झाल्याने हे प्राणी मोकळे होऊन पळून गेले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि पशुवैद्य प्राण्यांचा शोध घेत आहेत.
एफेलमधील खासगी प्राणिसंग्रहालयातून एका अस्वलानेही पलायन केले होते, मात्र त्याला नंतर गोळी घालून मारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button