breaking-newsमनोरंजन

“वीरे दी वेडिंग’ला पाकिस्तानात बंदी

शशांक घोष दिग्दर्शित “वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट शुक्रवारी भारतात प्रदिर्शत झाला. स्वच्छंदीपणे आयुष्य जगणा-या चारजणींभोवती फिरणारा हा चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक आहे. या चित्रपटाला भारतीय सेन्सॉर बोर्डाने “ए’ प्रमाणपत्र देऊन प्रमाणित केले असले तरी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने मात्र बंदी घातली आहे. यामुळे भारतीय प्रेक्षकांना जरी हा चित्रपट पाहता आला तरी हा चित्रपट पाकिस्तानमधील प्रेक्षकांना पाहता येणार नाही.

या चित्रपटात सोनम कपूर, करिना कपूर, शिखा तलसानिया आणि स्वरा भास्कर यांचा लुक खूपच बोल्ड आहे. या चित्रपटामध्ये आजच्या पिढीला आकर्षित करण्यासाठी काही अपशब्द आणि उथळ भाषेचा वापर करण्यात आला आहे.

यामुळे पाकिस्तानच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरने याच अपशब्दांवर आक्षेप घेत चित्रपटावर बंद घालण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सेन्सॉर मंडळातील सर्व सदस्यांनी हा निर्णय एकमताने घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध एकाही सदस्याने आवाज न उठविल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला. यामुळे शुक्रवारी पाकिस्तानशिवाय “वीरे दी वेडिंग’चे चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button