ताज्या घडामोडीBreaking-newsपिंपरी / चिंचवड

अजमेरा सोसायटी रोड, नेहरूनगरमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा!

दोन ठिकाणची सुमारे १ हजार ४५० चौ. फुटांची पत्राशेड निष्कासित

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मधील अजमेरा सोसायटी रोड आणि नेहरूनगर परिसरातील अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन ठिकाणची अंदाजे १ हजार ४५० चौरस फूट क्षेत्रफळाची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त-२ तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा

अभिनेत्री समांथा रूथ प्रभू झाली आई! १९ नोव्हेंबरला दिला गोंडस मुलाला जन्म; बाळाचे ठेवले ‘हे’ खास भारतीय नाव

महापालिकेच्या धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक प्रतिका चौरंगे, सौरभ शिरसाठ, इम्रान पठाण आणि दत्तात्रय छडीदार यांच्यासह १९ एमएसएफ जवान, सहा मजूर यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. कारवाईसाठी एक जेसीबी आणि एका क्रेनची मदत घेण्यात आली.

अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने थेट निष्कासनाची कारवाई केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group