Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी

एलॉन मस्क यांच्या SpaceXची ऐतिहासिक कामगिरी! अंतराळातून परतणाऱ्या ‘Starship’ला हवेतच पकडलं; थरारक व्हिडिओ व्हायरल

Elon Musk SpaceX | उद्योगपती एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ (SpaceX) कंपनीने अंतराळ संशोधन क्षेत्रात एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे. अंतराळातील २२ तासांचा कक्षीय प्रवास पूर्ण करून पृथ्वीवर परतणाऱ्या शक्तिशाली ‘स्टारशिप’ (Starship) अंतराळयानाला लाँच टॉवरच्या दोन अवाढव्य यांत्रिक हातांनी (‘मेकाझिला’ – Mechazilla) यशस्वीरित्या हवेतच पकडले आहे. अशा प्रकारे परतणाऱ्या स्टारशिप अंतराळयानाला लाँच टॉवरद्वारे हवेतच झेलण्याची ही जगातील पहिलीच वेळ असून, या थरारक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

स्पेसएक्सच्या सर्वात शक्तिशाली ‘स्टारशिप १५’ या स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या अंतराळयानाने २२ तासांच्या कक्षीय प्रवासानंतर शनिवारी टेक्सासमधील स्टारबेस केंद्रावर परतीचा प्रवास सुरू केला. ज्या लाँच टॉवरवरून आदल्या दिवशी हे यान अवकाशात झेपावले होते, त्याच टॉवरच्या दिशेने ते खाली उतरले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर यानाने आपली इंजिने पुन्हा सुरू करून स्वतःला सरळ स्थितीत आणले आणि हळूहळू लाँच टॉवरच्या ‘मेकाझिला’ (Mechazilla) नावाच्या यांत्रिक हातांमध्ये प्रवेश केला. या यांत्रिक हातांनी अचूक वेळ साधत या यानाला हवेतच पकडले; इंजिन बंद झाल्यानंतर हे महाकाय यान जमिनीपासून वर यांत्रिक हातांमध्येच व्यवस्थित स्थिरावले.

हेही वाचा

ललित मोदी यांनी स्वीकारले ब्रिटिश नागरिकत्व! लंडनच्या ‘ऑक्सफोर्ड युनियन’मधून केली अधिकृत घोषणा

पुनर्वापर करण्यायोग्य रॉकेट प्रणालीतील मोठा टप्पा

संपूर्णपणे पुनर्वापर करण्यायोग्य (Reusable) रॉकेट प्रणाली विकसित करण्याच्या एलॉन मस्क यांच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील हा एक अत्यंत निर्णायक टप्पा मानला जात आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या प्रक्षेपणानंतर ‘सुपर हेवी’ बूस्टरचा स्फोट झाल्यामुळे रॉकेटचे दोन्ही टप्पे सुरक्षितपणे परत मिळवण्याचे स्पेसएक्सचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. असे असले तरी, स्टारशिप यानाचे हवेत झालेले यशस्वी ‘कॅच लँडिंग’ पाहून जगभरातून स्पेसएक्सच्या तंत्रज्ञानाचे कौतुक होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group