Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

कुलगाम चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भट ठार; कुलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप

मशिदीत लपलेल्या लतीफला आत्मसमर्पणाचे आवाहन; कुलगामच्या एसएसपींकडून चकमकीला दुजोरा, सुरक्षा दलाची कारवाई

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट ठार झाला आहे. कुलगाममधील सीआरपीएफच्या नाक्यावर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा आरोप आहे. कुलगामचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) अनायत अली यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लतीफ भट एका मशिदीत लपला होता. त्याला आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली होती. एसएसपी अनायत अली यांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्याशी संवाद साधत शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. आत्मसमर्पण केल्यानंतर त्याच्यावर चकमकीची कारवाई केली जाणार नाही, असा विश्वासही दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, लतीफने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला.

मशिदीला नुकसान होऊ नये याची काळजी

एसएसपी अनायत अली यांच्या माहितीनुसार, लतीफ रात्री सुमारे २.४५ वाजता मशिदीत पोहोचला होता. त्याला बाहेर आणण्यासाठी सुरुवातीला संवादाचा मार्ग अवलंबण्यात आला. मात्र, त्याने प्रतिसाद न दिल्याने सुरक्षा दलाने अश्रुधुराचा वापर केला. धार्मिक स्थळाला नुकसान होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आणि सुरक्षा दलाने मशिदीत प्रवेश करून कारवाई करण्याऐवजी त्याच्या बाहेर येण्याची प्रतीक्षा केली, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा –  हिवाळ्यात निरोगी राहायचे आहे? आहारात करा या ६ पदार्थांचा समावेश; रोगप्रतिकारशक्ती टिकवण्यास होईल मदत

सीमेपलीकडून कारवायांचे निर्देश मिळाल्याचा दावा

लतीफ भट १८ नोव्हेंबर २०२५ रोजी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आला आहे. सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमधील शांतता, पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला बाधा पोहोचवण्याचे निर्देश त्याला मिळत असल्याची माहितीही समोर आली आहे.

कुलगाममधील सीआरपीएफ हल्ल्याशी संबंध असल्याचा आरोप

कुलगाम जिल्ह्यातील अखरान परिसरात सीआरपीएफच्या नाक्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत लतीफ भटचा सहभाग असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा आरोप आहे. या हल्ल्याच्या एक दिवस आधी लतीफ भट आणि उमर निसार डार यांनी मीर बाजार, अखरान, हबलिश आणि किलम या परिसरांची पाहणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. या हालचाली सीसीटीव्हीमध्ये नोंदवल्या गेल्याचेही सांगितले जात आहे.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अखरान परिसरातील सीआरपीएफच्या नाक्यावर गोळीबार झाला होता. या घटनेच्या तपासादरम्यान लतीफ भटचे नाव समोर आल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला होता. त्यानंतर त्याच्या शोधासाठी सुरक्षा दलाकडून मोहीम सुरू होती. अखेर कुलगाममधील चकमकीत तो ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group