Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

अंडर-१९ आशिया चषकात भारताची विजयी सलामी! आर्यवीर सेहवागचे ५२ चेंडूंत वादळी अर्धशतक; नेपाळचा धुव्वा

India Under 19 vs Nepal Under-19 | अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा १० गडी राखून धुव्वा उडवला. प्रथम गोलंदाजीत कमाल दाखवत भारताने नेपाळला अवघ्या १२८ धावांवर गुंडाळले. त्यानंतर विजयासाठी मिळालेले १२९ धावांचे सोपे आव्हान भारताच्या सलामी जोडीने अवघ्या १९.१ षटकांत एकही गडी न गमावता सहज पार केले. सलामीवीर आर्यवीर सेहवाग आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानी यांनी तडाखेबंद अर्धशतके झळकावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा मुलगा आर्यवीर सेहवागने मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी केली. डावाची सुरुवात करताना आर्यवीरने ५२ चेंडूंत ७ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या जोरावर नाबाद ७० धावा कुटल्या, जे त्याचे युथ वनडे क्रिकेटमधील पहिले अर्धशतक ठरले. दुसऱ्या टोकाला संयमी व आक्रमक खेळी करत कर्णधार लक्ष्य रायचंदानीने ६३ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. या दोघांनी अभेद्य सलामी देत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

हेही वाचा

तन्वी पत्रीची युवा ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी! बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; नेपाळ १२८ धावांत गारद

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला; नेपाळकडून दर्ष सोनारने सर्वाधिक ४३, आशीष लुहारने २९ आणि नीरज यादवने २० धावा केल्या तरी त्यांचे तब्बल ४ फलंदाज शून्यावर माघारी परतल्याने फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली, तर भारताकडून भेदक मारा करत इशान सूद आणि अर्जुन राजपूत यांनी प्रत्येकी ३-३, यशवीर गौडने २ आणि काव्य पटेलने १ बळी मिळवत नेपाळचा संपूर्ण डाव अवघ्या १२८ धावांवर गुंडाळला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group