Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला चाललाय! ‘गोकुळ’ दूध संघ निकालांवरून राहुल गांधींचा घणाघात

नवी दिल्ली | कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्या निवडणुकीवरून आता राष्ट्रीय पातळीवर राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणात थेट उडी घेत भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. “गोकुळमध्ये पराभव दिसताच भाजपने निवडणुकीनंतर नियम बदलून जनादेशात भेसळ केली असून ही दूध उत्पादकांच्या मतांची उघड चोरी आहे,” असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या पोस्टचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी हा संताप व्यक्त केला.

राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपला धूळ चारली. मात्र पराभव पचवता न आल्याने भाजपने निवडणुकीनंतर थेट नियमच बदलून टाकले. ४ संचालक घुसवा, १२ चे १६ करा आणि बहुमत चोरा, हा नवा खेळ सुरू आहे. ही सरळसरळ दूध उत्पादकांच्या मतांची चोरी असून जनादेशात भेसळ करण्याचा प्रकार आहे. प्रत्येक ठिकाणी सत्ता टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला चालला असून इतका हताश झाला आहे. पण मतांची चोरी करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, शेतकरी हा प्रकार कधीही विसरणार नाहीत.”

हेही वाचा

दिल्लीत हृदयद्रावक घटना! ९ वर्षांच्या मुलीचा कार्डिॲक अरेस्टमुळे मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज समोर

दरम्यान, गोकुळ निवडणुकीत महायुतीला पराभवाचा धक्का देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांनी राहुल गांधींच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले. “कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज बनल्याबद्दल धन्यवाद राहुल जी! गोकुळचा जनादेश हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे. हा जनादेश हिरावून घेऊ पाहणाऱ्यांविरोधात आम्ही न्यायालयातही लढू आणि रस्त्यावर उतरूनही संघर्ष करू,” असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.

‘गोकुळ’मध्ये नेमकं काय घडलं?

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी गोकुळसंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये महासंघाच्या निवडणुकीतील घडामोडींचा उल्लेख करत भाजपा व महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केलं आहे. “१९ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोकुळ दूध महासंघ निवडणुकीत काँग्रेसप्रणीत पॅनलने २५ पैकी १३ जागा जिंकल्या. महायुतीला १२ जागा जिंकता आल्या. त्यापुढे काँग्रेसप्रणीत पॅनलला बहुमत मिळालं. त्यानंतर महायुतीच्या संचालकांनी सभेला अनुपस्थित राहून अध्यक्षांची निवडणूक अडवून धरली. यावर मुंबई उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले”, असं पवन खेरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group