TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार अमित गोरखे यांनी वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी

दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ लाख ५१ हजारांचा धनादेश सुपूर्द केला

पिंपरी चिंचवड, : वाढदिवसाचा खरा आनंद समाजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवण्यात आहे. वाढदिवस हा केवळ शुभेच्छा आणि सत्काराचा दिवस नसून, समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे, असा प्रेरक संदेश देत विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक आदर्श उपक्रम राबवला आहे. वाढदिवसाचा फराळ किंवा भव्य स्वागतावर खर्च करण्याऐवजी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 2 लाख 51 हजार रुपयेचा धनादेश नुकताच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द

सध्या राज्यातील काही भागांत शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहेत. अशा बिकट परिस्थितीत बळीराजाला धीर देणे आणि त्यांना आर्थिक आधार देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे, अशी भूमिका आमदार अमित गोरखे यांनी या प्रसंगी मांडली. मंत्रालयात झालेल्या या सदिच्छा भेटीदरम्यान मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आमदार अमित गोरखे यांच्या या संवेदनशील व लोककल्याणकारी निर्णयाचे मनापासून कौतुक केले. राजकीय व सामाजिक क्षेत्रात वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणी असे लोकोपयोगी उपक्रम राबवणे इतर कार्यकर्त्यांसाठी व नेत्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

हेही वाचा –  एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठा दिलासा! वयोमर्यादेत एक वर्षाची सूट, १६ हजारांहून अधिक पदांची शिफारस

संकट काळात बळीराजाला आधार

या प्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले, संकटाच्या काळात आपल्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे, हे मी माझे सामाजिक कर्तव्य मानतो. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याची परतफेड समाजसेवा करूनच करणे माझे ध्येय आहे.

आमदार अमित गोरखे यांच्या या स्तुत्य उपक्रराबद्दल पिंपरी-चिंचवड शहर तसेच राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्या अशा नेतृत्वामुळे राजकीय वर्तुळातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group