ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

National Sport Climbing । पिंपळे सौदागरमध्ये राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लायम्बिंगचा थरार!

३०व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातील खेळाडूंचे कौशल्य पणाला

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडून स्पर्धकांना प्रोत्साहन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

उंच क्लायम्बिंग वॉलवर पकड साधत, तोल सांभाळत आणि वेग राखत देशभरातील खेळाडू पिंपळे सौदागरमध्ये आपले कौशल्य दाखवत आहेत. येथील योगा पार्कमधील क्लायम्बिंग कॉम्प्लेक्समध्ये ३०व्या राष्ट्रीय स्पोर्ट क्लायम्बिंग अजिंक्यपद स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन आणि महाराष्ट्र क्लायम्बिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भिंतीवर चढताना पुढची पकड अचूक निवडणे, शरीराचा तोल राखणे आणि योग्य क्षणी हालचाल करणे, यावर खेळाडूंची कामगिरी अवलंबून असते. त्यामुळे वेग आणि शारीरिक ताकदीसोबतच तंत्र व एकाग्रतेचाही कस लागत आहे.

हेही वाचा

काँग्रेसला मोठा धक्का, तर भाजपाचा मार्ग सुकर! मतदारसंघ फेररचना विधेयकाला एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमकेचा पाठिंबा

काटे यांनी स्पर्धकांच्या चढाईचे निरीक्षण केले आणि त्यांच्याशी संवाद साधून तयारी व स्पर्धेतील अनुभव जाणून घेतले. राष्ट्रीय स्तरावरील अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळते आणि स्थानिक तरुणांना साहसी खेळ जवळून पाहता येतात, असे त्यांनी नमूद केले.

या स्पर्धेच्या निमित्ताने योगा पार्कमधील क्लायम्बिंग कॉम्प्लेक्सला राष्ट्रीय स्तरावर आपली सुविधा दाखविण्याची संधी मिळाली आहे. देशभरातील खेळाडूंची चढाई आणि त्यांचे तंत्र प्रत्यक्ष पाहता येत असल्याने स्थानिक क्रीडाप्रेमींमध्येही उत्साह आहे.

“पिंपळे सौदागर येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पोर्ट क्लायम्बिंग स्पर्धेचे आयोजन होणे ही आपल्या शहरासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अशा स्पर्धांमुळे खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळते. शहरात अशा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत राहावे आणि स्थानिक खेळाडूंनाही या माध्यमातून प्रोत्साहन मिळावे, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

– शत्रुघ्न (बापू) काटे, भाजप शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group