TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

Ramayana Movie : यशच्या अभिनयाने मुलगा यथर्व भारावला; साई पल्लवीने सांगितला खास भावूक अनुभव

 ‘रामायण’ चित्रपटातील रावण आणि जटायू यांच्यातील प्रसंग पाहून यशचा मुलगा भावुक झाला. “तुम्ही त्या पक्ष्याला मारायला नको होते,” अशी प्रतिक्रिया यथर्वने वडिलांना दिल्याचे साई पल्लवीने सांगितले.

Yash Ramayana Movie : बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची चर्चा रंगू लागली आहे. या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता यश याच्या मुलांनीही चित्रपट पाहिला आहे. चित्रपटातील एका प्रसंगामुळे यशचा मुलगा यथर्व भावुक होऊन रडू लागल्याचा खुलासा अभिनेत्री साई पल्लवीने केला आहे.

२७ ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील ‘अकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्स’मध्ये ‘रामायण’चा वर्ल्ड प्रीमियर पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान साई पल्लवीने यशच्या मुलांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले.

यशचा मुलगा यथर्व का झाला भावुक?

‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवीने सांगितले की, रावण जटायूचा वध करतो, हा प्रसंग पाहून यशचा मुलगा यथर्व रडू लागला. यथर्वने वडिलांना उद्देशून, “तुम्ही त्या पक्ष्याला मारले, हे मला अजिबात आवडले नाही. चित्रपटातही तुम्ही त्या पक्ष्याला मारायला नको होते,” अशी प्रतिक्रिया दिली.

साई पल्लवीच्या मते, यथर्वला वडील यश चित्रपटात अभिनय करत आहेत, याची जाणीव होती. तरीही त्याने त्या प्रसंगाला चुकीचे ठरवले. यथर्वची ही प्रतिक्रिया खूपच सुंदर आणि भावूक करणारी असल्याचे साई पल्लवीने सांगितले.

यशनेही मुलांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. “त्यांच्या मनात अनेक प्रश्न असल्याचे मला जाणवत होते. कारण त्यांच्यासाठी आयुष्याची सुरुवातच झाली आहे. एकमेकांशी कसे वागावे आणि एकमेकांचा आदर कसा करावा, हे ते समजून घेत आहेत. माझ्या मुलाची प्रतिक्रिया पाहून मला आश्चर्य वाटले,” असे यश म्हणाला.

हेही वाचा –  स्थानिक वाहनधारकांसाठी टोल पासचे नवे दर लागू; १,५०० आणि ३,००० रुपयांत वर्षभर प्रवासाची सुविधा

यश आणि राधिका पंडित यांना दोन मुले

यशच्या पत्नीचे नाव राधिका पंडित आहे. या जोडप्याला आर्या नावाची मुलगी आणि यथर्व नावाचा मुलगा अशी दोन मुले आहेत. यश आणि राधिका यांचा विवाह ९ डिसेंबर २०१६ रोजी झाला होता.

५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार ‘रामायण’

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण’ चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटात सनी देओल, अरुण गोविल, लारा दत्ता, शीबा चड्ढा, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंह, कुणाल कपूर आणि रवी दुबे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचे दोन भाग; दुसरा भाग पुढील वर्षी

‘रामायण’ चित्रपटाचे दोन भाग करण्यात आले आहेत. पहिला भाग प्रदर्शनासाठी सज्ज असून, दुसरा भाग पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून, नमित मल्होत्रा यांनी निर्मिती केली आहे.

रणबीर कपूरच्या श्रीराम भूमिकेकडे लक्ष

या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. त्याची या भूमिकेसाठी निवड जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, चित्रपटातील रणबीरचा पहिला लूक समोर आल्यानंतर काही प्रेक्षकांची मते बदलल्याचे पाहायला मिळाले. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असल्याने रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत कसा दिसणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button