ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघीकरांचा ‘एक हात मदतीचा’; चार गावांतील सुमारे हजार कुटुंबांना दिलासा

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

नगरसेवक उदय गायकवाड व सहकाऱ्यांकडून महिनाभर पुरेल इतक्या अन्नधान्याचे वाटप

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या आवाहनाला दिघी-बोपखेलमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतील देवळे, खटकाळे, निमगिरी आणि पिंपरगणे या चार गावांना भेट देऊन ९०० ते १,००० कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

ह. भ. प. दत्तात्रय आबा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक चारचे भाजप नगरसेवक उदय दत्तात्रय गायकवाड, भाजप सरचिटणीस विकास हरिश्चंद्र डोळस, नगरसेवक कृष्णाजी सुरकुले आणि नगरसेविका हिरानानी घुले यांनी सहकाऱ्यांसह हा उपक्रम राबवला. उदय गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक ट्रकभर अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू या गावांपर्यंत पोहोचवल्या.

हेही वाचा

कोणीही वंचित राहू नये म्हणून डीपीवरील सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत घेणार!

अवकाळी पाऊस असो वा दुष्काळ, संकटात सापडलेल्या बांधवांना मदत करण्याची सामाजिक बांधिलकी दिघी आणि भोसरीच्या नागरिकांनी जपली आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून हा उपक्रम राबवल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

फुलाची पाकळी म्हणून ही मदत घेऊन आलो आहोत. आपण या मदतीचा स्वीकार करावा आणि शक्य असेल तेव्हा इतर गरजूंनाही मदतीचा हात द्यावा. संकटाच्या काळात कष्टकरी कुटुंबांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, ही आमची भावना आहे. भविष्यातही अशा प्रसंगी आम्ही आपल्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.

– उदय दत्तात्रय गायकवाड, नगरसेवक, दिघी-बोपखेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group