प्रियदर्शनी स्कूल मोशीच्या खेळाडूंची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी
क्रिकेटमध्ये विजेतेपद, तर फुटबॉलमध्ये उपविजेतेपद पटकावले

पिंपरी : प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथील विद्यार्थ्यांनी आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जीजीआयएस स्कूल, बावधन येथे आयोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रियदर्शनी स्कूलच्या १५ वर्षांखालील (Under-15) क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावत दिमाखदार यश संपादन केले.
तसेच याच आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत शाळेच्या १३ वर्षांखालील (Under-13) फुटबॉल संघाने उपविजेतेपद मिळवत आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध केली.
हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महागोदा आरती; पर्यावरणपूरक सिंहस्थाचा संकल्प
दोन्ही संघांनी उत्कृष्ट सांघिक भावना, शिस्त, जिद्द आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत मैदानावर आपली छाप उमटवली.
या यशामागे विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, नियमित सराव आणि क्रीडा शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मोलाचे ठरले.
विद्यार्थ्यांच्या या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि व्यवस्थापनाने सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या प्रियदर्शनी स्कूलच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे.




