Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

इराण-अमेरिका संघर्ष शिगेला! इराणच्या इशाऱ्यानंतर ट्रम्प यांची नव्या हल्ल्यांची धमकी

Trump Iran Threat updates | इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलला दिलेल्या थेट युद्धाच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. इराणची अणुयंत्रणा आधीच उद्ध्वस्त करण्यात आली असून, उरलेल्या एक किंवा दोन संशयित ठिकाणांचा बंदोबस्त करायचा आहे आणि अमेरिका हे काम अवघ्या १० मिनिटांत करू शकते, असा सज्जड इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. शनिवारी फ्लोरिडा येथील मार-ए-लागो या आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

अमेरिकेने केलेल्या कारवाईमुळे इराणची लष्करी क्षमता आणि अणुप्रकल्प मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ते म्हणाले, “आम्ही त्यांची अणुयंत्रणा आधीच उद्ध्वस्त केली आहे. मला वाटते की आम्हाला अजूनही एक-दोन ठिकाणांचा बंदोबस्त करावा लागेल, परंतु आम्ही ते अवघ्या १० मिनिटांत करू शकतो.” यावेळी ट्रम्प यांनी इराणच्या नतांझ अणुप्रकल्पाजवळील ‘पिकॅक्स माउंटन’ या अत्यंत सुरक्षित व संशयित भूमिगत संकुलाचा विशेष उल्लेख करत, अमेरिका त्याचाही बंदोबस्त करेल असे स्पष्ट संकेत दिले.

हेही वाचा

दिवाळीपूर्वी महागाईचा भडका! व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि विमान इंधन महागले

इराणचा ‘भौगोलिक मर्यादांशिवाय’ प्रतिहल्ल्याचा इशारा

यापूर्वी, इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी एका संदेशाद्वारे अमेरिका आणि इस्रायलला कठोर इशारा दिला होता. “विरोधकांनी पुन्हा लष्करी किंवा दहशतवादी कारवाया केल्यास, या नव्या संघर्षाचा शेवट करण्याची वेळ आणि अटी इराण स्वतः ठरवेल,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच शत्रूच्या धोक्यांना ‘भौगोलिक मर्यादा नसलेले’ (Geographically Unrestricted) आक्रमक प्रत्युत्तर देण्याचे निर्देश त्यांनी लष्कराला दिले आहेत. सशस्त्र दलांना अमेरिका व इस्रायली मालमत्ता टप्प्यात आणण्यासाठी लक्ष्य सूची (Target List) अद्ययावत करण्याचे आणि शस्त्रास्त्रांचे उत्पादन वेगाने वाढवण्याचे आदेशही त्यांनी जारी केले आहेत.

मध्यवर्ती निवडणुकांनंतर नव्या हल्ल्यांची चर्चा

३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकेच्या मध्यवर्ती निवडणुकांनंतर (Midterm Elections) ट्रम्प प्रशासन इराणवर नव्या हल्ल्यांची मोहीम आखू शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी अद्याप नव्या हल्ल्यांबाबत अंतिम निर्णय झाला नसून, वॉशिंग्टन राजनैतिक तोडग्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनीही चर्चा सुरू असल्याचे मान्य केले, मात्र “इराण फारसा विश्वासार्ह नाही” असे म्हणत त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button