ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्स, पुणे येथील कार्यरत दाम्पत्य प्रियांका खेडकर ( लेखिका) आणि मयूर खेडकर (दिग्दर्शक ) यांच्या ‘मिशन पर्यावरण’ शैक्षणिक बालचित्रपटाच्या लेखनाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद!

पिंपरी-चिंचवड :  पुणे आणि पिंपरी-चिंचवड (पीसीएमसी) महानगराचा शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा उंचावणारी एक अभिमानास्पद कामगिरी समोर आली आहे. प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्स, पुणे येथील कार्यरत दाम्पत्य प्रियांका मयूर खेडकर लिखित आणि मयूर खेडकर दिग्दर्शित, अत्याधुनिक डिजिटल व व्हिज्युअल माध्यमाच्या प्रभावी वापराद्वारे निर्मित ‘Mission Paryavaran’ या शैक्षणिक बालचित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) ‘U’ प्रमाणपत्र मिळाले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्रियांका मयूर खेडकर यांना ‘India Book of Records’ द्वारे ‘IBR Achiever’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. पुणे आणि पीसीएमसी परिसरातील शिक्षण व कला क्षेत्रातून खेडकर कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पर्यावरणाविषयी आदर आणि निष्ठा जागृत करत, नवीन पिढीला आधुनिक तंत्रज्ञान व सृजनशील विचारातून एक उज्ज्वल भविष्य घडवण्यास प्रेरित करणारी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मार्गदर्शक कलाकृती ठरत आहे.

हेही वाचा –  नागपूरच्या पराभवानंतर महायुतीत नेतृत्वाचा प्रश्न; शिंदेसेनेच्या भूमिकेने भाजपसमोर नवे आव्हान

या उल्लेखनीय यशाबद्दल प्रियदर्शनी स्कूलच्या व्यवस्थापनाने, प्राचार्यांनी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रियांका मयूर खेडकर आणि मयूर खेडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या सर्जनशीलतेचे, कल्पकतेचे आणि पर्यावरण संवर्धनासाठीच्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठेत भर पडली आहे. भविष्यातही त्यांनी अशाच नावीन्यपूर्ण उपक्रमांतून समाजाला आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी, अशा शुभेच्छा शाळा व्यवस्थापन, प्राचार्य आणि कर्मचारीवृंदाने व्यक्त केल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button