Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत-पाकिस्तान संघ दोनदा भिडणार; अंडर-१९ आणि रायझिंग आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर

India vs Pakistan | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैदानावरचा थरार अनुभवण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेटप्रेमींसाठी नोव्हेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या एकाच महिन्यात दोन्ही देशांचे संघ दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येणार आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ‘अंडर-१९ आशिया चषक’ आणि कतारची राजधानी दोहा येथे रंगणाऱ्या ‘रायझिंग आशिया चषक’ या दोन्ही स्पर्धांमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.

दोन्ही सामन्यांचे वेळापत्रक

  • ८ नोव्हेंबर, रविवार: अंडर-१९ आशिया चषक – भारत वि. पाकिस्तान (सकाळी १०.३० वाजता)
  • २२ नोव्हेंबर, रविवार: रायझिंग आशिया चषक – भारत वि. पाकिस्तान (दुपारी ३.३० वाजता)

रायझिंग आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक

दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर १९ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘रायझिंग आशिया चषक’ स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेची सुरुवात १९ नोव्हेंबर रोजी बांगलादेश वि. हाँगकाँग आणि श्रीलंका वि. अफगाणिस्तान या सामन्यांनी होईल.

हेही वाचा

“YSN” चॅम्पियन्स ट्रॉफीवर ग्रॅव्हिटी टायटन्सची मोहोर!

भारतीय संघाचा पहिला सामना २० नोव्हेंबरला नेपाळविरुद्ध होईल. त्यानंतर २२ नोव्हेंबरला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत रंगेल. साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना २४ नोव्हेंबर रोजी युएईविरुद्ध होईल. या स्पर्धेचे उपांत्य सामने २६ आणि २७ नोव्हेंबरला पार पडतील, तर महाअंतिम सामना २९ नोव्हेंबर रोजी याच मैदानावर खेळवला जाईल.

पाकिस्तान ‘अ’ संघाकडे जेतेपद; भारतासमोर आव्हान

या स्पर्धेच्या मागील मोसमात पाकिस्तान ‘अ’ संघाने विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात बरोबरी सुटल्याने रंगलेल्या ‘सुपर ओव्हर’मध्ये पाकिस्तानने बाजी मारली होती. यंदाच्या २०२६ च्या स्पर्धेत भारतीय ‘अ’ संघासमोर गेल्या मोसमातील निराशाजनक कामगिरी पुसून काढत विजेतेपदावर नाव कोरण्याचे आव्हान असेल. यासाठी २२ नोव्हेंबरला होणारा भारत-पाक सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button