ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

नूतन अभियांत्रिकीच्या प्रसिद्धी प्रमुख प्रिती घुले यांची रांगोळीतून रेणुकामातेला भक्तीपूर्ण आदरांजली!

माहूरच्या श्री रेणुकामातेचे रांगोळीतून नयनरम्य रूप; नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला प्रिती आदक-घुले यांची कलाकृती साकार!

​ पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

आद्यशक्तीच्या उपासनेचा आणि आदिशक्तीच्या जागराचा सण म्हणजेच नवरात्रोत्सव! या पावन पर्वानिमित्त नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला तळेगाव दाभाडे येथील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रसिद्धी प्रमुख सौ . प्रिती नितीन आदक (प्रिती घुले ) यांनी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या श्री माहूरगडच्या रेणुकामातेची अत्यंत सुरेख आणि भक्तीमय रांगोळी रेखाटून मातेच्या चरणी आपली कलासेवा अर्पण केली आहे.

​सौ. प्रिती घुले या गेल्या २० वर्षांपासून रांगोळी कलेची साधना करत आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांनी अत्यंत समर्पणाने सलग ६ तास मेहनत घेऊन ही आकर्षक कलाकृती पूर्ण केली. विशेष म्हणजे, यासाठी कोणतेही महागडे किंवा रासायनिक रंग न वापरता अत्यंत साध्या आणि पारंपरिक रंगांचा वापर करून रेणुकामातेचे तेजस्वी व नयनरम्य रूप रांगोळीत हुबेहूब जिवंत केले आहे.

हेही वाचा

पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

​गेल्या दोन दशकांपासून रांगोळीच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि सामाजिक विषय मांडणाऱ्या सौ. घुले यांची ही कलाकृती पाहून नागरिकांकडून व कलाप्रेमींकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी माहूरगडच्या रेणुकामातेची ही सुरेख रांगोळी साकारून त्यांनी मातेच्या चरणी रांगोळीरूपी भक्तीसुमनांची सेवा अर्पण केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button