TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

निवडणूक आयुक्तांच्या मुद्द्यावरून दिल्लीतील आंदोलन चिघळलं; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी गाडी घेरली; राऊतांची पोस्ट चर्चेत, ठाकरे बंधूंच्या मोर्च्यानंतर राजकीय वातावरण तापलं

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्तपासणीच्या (SIR) मुद्द्यावरून राजधानी दिल्लीत आंदोलनाला वेग आला आहे. रविवारी इंडिया गेट ते जंतर-मंतर असा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाल्याने दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेड्स लावून मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा यांना ताब्यात घेतले. त्यांना एका खासगी वाहनातून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी वाहनाला घेराव घालत रस्ता अडवला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत.

नेहा बोरा यांना पोलिसांनी नंतर दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्याकडील फोन आणि बॅग ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केंद्र सरकारवर टीका केली.

राऊत यांनी आंदोलनादरम्यानचा व्हिडीओ शेअर करत, “दिल्लीची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मोदी-शहा वगैरेंची दहशत या पोरांनी नष्ट केली आहे,” असा दावा केला. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनाला घेरल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकार आणि दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही त्यांनी टीका केली.

हेही वाचा –  रानटी समजल्या जाणाऱ्या या ७ वनस्पतींचे आयुर्वेदात महत्त्व; घरच्या कुंडीतही लावता येतात

ठाकरे बंधूंच्या मोर्च्यानंतर दिल्लीतील आंदोलन

यापूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्रितपणे भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर सत्ताधारी भाजपला अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप केला, तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीच्या SIR प्रक्रियेला विरोध दर्शवला.

या मोर्चात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख यांच्यासह विरोधी पक्षांतील नेते सहभागी झाले होते.

दरम्यान, SIR प्रक्रियेवरून विरोधक आणि निवडणूक आयोग यांच्यातील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर मुंबईनंतर दिल्लीतील आंदोलनामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button