Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे दोन धक्के; प्रशासन सतर्क

पांगरा शिंदे परिसरात ४.५ रिश्टर स्केलचा धक्का; औंढा नागनाथ तालुक्यात ३.३ रिश्टर स्केलची नोंद, जीवित व वित्तहानी नाही

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात सकाळी ९.४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे धक्के हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जाणवले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यापूर्वी औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात सकाळी ७.४६ वाजता भूगर्भातून आवाजासह सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. त्यानंतर पांगरा शिंदे परिसरातील ४.५ रिश्टर स्केलच्या धक्क्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी पाहणी आणि पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा –  नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; जीवितहानी नाही

दरम्यान, पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. भूकंपासंदर्भातील अधिकृत माहिती मिळविण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून भूकंपाच्या धक्क्यांनंतर संभाव्य परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button