Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; जीवितहानी नाही

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर केंद्रबिंदू; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

नांदेड : नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राला प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार, या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ३.३ आणि ४.५ इतकी नोंदविण्यात आली आहे. या भूकंपांचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

भूकंपाच्या धक्क्यांमुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा तत्काळ आढावा घेतला असून, संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे.

भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही भागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यास सुरक्षितपणे घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे तसेच प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  दुष्काळ आणि मराठा आरक्षणावर रामदास आठवलेंची भूमिका; अभिजीत दिपकेंना इशारा

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी कोणतीही अफवा अथवा अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button