Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

रशियाचा युक्रेनवर भीषण ड्रोन हल्ला; भारतीय कंपनीचा औषध प्रकल्प उद्ध्वस्त

Russia Drone Attack Ukraine | रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला चार वर्षे पूर्ण होत आली असताना हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. रविवारी (४ ऑक्टोबर) रशियन सैन्याने युक्रेनच्या विविध शहरांवर भीषण हवाई आणि ड्रोन हल्ले चढवले. या हल्ल्यांमध्ये सुमी शहरातील भारतीय औषध उत्पादक कंपनी ‘कुसुम ग्रुप’चा (Kusum Healthcare) औषध निर्मिती प्रकल्प व गोदाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

सुमी येथील भारताच्या ‘कुसुम ग्रुप’च्या मुख्य इमारतीला आणि औषध गोदामाला रशियन ड्रोनने लक्ष्य केले. हल्ल्यानंतर इमारतीतून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. औषध प्रकल्पाच्या मोठ्या भागाचे नुकसान झाले असून, नागरी व आरोग्य पायाभूत सुविधांना टार्गेट केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; गर्जना मोर्चातून राज ठाकरेंचा थेट एल्गार!


हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “रशियाने रात्रभरात युक्रेनवर १३५ ड्रोन डागले, ज्यापैकी ५० हून अधिक ड्रोन अत्याधुनिक ‘जेट-पावर्ड’ होते. कीव्हमधील पूल, निप्रोमधील दळणवळण केंद्र आणि सुमीमधील औषध गोदामावर हे हल्ले झाले. निवासी इमारती आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून रशिया सामान्य जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.” या हल्ल्यांमुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून बचावकार्य सुरू आहे.

जर्मनीच्या चान्सलरचा युक्रेन दौरा

या तणावाच्या वातावरणात जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ हे युक्रेन दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भेटीबाबत बोलताना झेलेन्स्की म्हणाले, “युक्रेन आणि युरोपच्या संरक्षणासाठी जर्मनी सातत्याने पाठबळ देत आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे संरक्षण करार होणार असून, रशियाच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्र येणे गरजेचे आहे.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group