Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; गर्जना मोर्चातून राज ठाकरेंचा थेट एल्गार!

मुंबई | मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विराट ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगापुढे दोन प्रमुख मागण्या मांडत जोरदार हल्लाबोल केला.

देशभरात राबवण्यात आलेली विशेष फेरतपासणी प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांच्या भूमिकेचा संदर्भ देत ते म्हणाले, “स्पेशल रिव्हिजन ही अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत, लेखी कारणे नोंदवून आणि केवळ विशिष्ट मतदारसंघापुरतीच करता येते. संपूर्ण भारतात सरसकट एसआयआर करण्याची कायद्यात कोणतीही तरतूद नाही. नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, मोठे स्थलांतर किंवा दुबार नावांच्या तक्रारी असतील तरच अशी कारवाई केली जाते.” पुढे बोलताना त्यांनी सवाल उपस्थित केला की, “विधानसभेवेळी मोठ्या प्रमाणावर मतदार वाढवायचे आणि आता एसआयआरच्या नावाखाली थेट २ कोटी लोकांना बाहेर काढायचे? हे नेमके कोणाचे मतदार आहेत? म्हणूनच आत्तापर्यंत झालेली ही संपूर्ण एसआयआर प्रक्रिया तत्काळ रद्द झाली पाहिजे.”

हेही वाचा

जंतरमंतरवर महिला पत्रकारांशी पोलिसांचे गैरवर्तन; राहुल गांधींचे अमित शहांवर थेट टीकास्त्र

ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घ्या..

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर बोट ठेवत राज ठाकरेंनी ईव्हीएमऐवजी पारंपरिक मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी केली. राज ठाकरे म्हणाले, “या देशातील व्होटिंग मशिन (EVM) पूर्णपणे बंद करून निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत. या दोन गोष्टी झाल्या तर ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल. निवडणुका निष्पक्ष झाल्या तर उद्या कोणाचीही सत्ता आली तरी कोणाचा आक्षेप असणार नाही.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button