Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

कुमार कुशाग्रचं नेपाळविरुद्ध दमदार शतक! कोण आहे हा युवा फलंदाज?

Kumar Kushagra Century | कतारमध्ये सुरू असलेल्या एशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ (Asia Cup Rising Stars 2026) स्पर्धेत भारत अ आणि नेपाळ यांच्यातील साखळी फेरीतील चौथ्या सामन्यात युवा यष्टीरक्षक-फलंदाज कुमार कुशाग्र याने आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेपाळविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीलाच अडचणीत सापडला असताना, कुमार कुशाग्रने कर्णधार तिलक वर्माच्या साथीने डाव सावरत ९३ चेंडूंमध्ये शानदार शतक झळकावले.

या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून भारतीय अ संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीला आलेली अभिषेक शर्मा (९ धावा) आणि वैभव सूर्यवंशी (२६ धावा) यांची जोडी फार काळ मैदानावर टिकू शकली नाही. आयुष बदोनीही अवघ्या २ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ४२ अशी बिकट झाली होती. मात्र, यानंतर मैदानात आलेल्या कुमार कुशाग्रने कर्णधार तिलक वर्माच्या साथीने नेपाळच्या गोलंदाजांचा समाचार घेत २०० हून अधिक धावांची भागीदारी रचली आणि संघाची धावसंख्या २५० पार पोहोचवली. कुशाग्रने ९३ चेंडूंमध्ये षटकार मारून भारतीय अ संघासाठी आपले पहिलेवहिले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर त्याने केलेले खास सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा

वायसीएम रुग्णालयातील १ कोटी ७२ लाखांचा निकृष्ट व विनापरवाना औषधसाठा जप्त!

कोण आहे भारताचा नवा ‘पॉवर हिटर’ कुमार कुशाग्र?

झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा कुमार कुशाग्र हा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला आपला आदर्श मानतो आणि धोनीला पाहूनच त्याने वयाच्या १० व्या वर्षी यष्टीरक्षण करण्यास सुरुवात केली होती; तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मोठे फटके मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने आतापर्यंत ३८ प्रथम श्रेणी सामन्यांत ४२ च्या सरासरीने २,५०७ धावा केल्या असून, वयाच्या १५ व्या वर्षी २०२० च्या अंडर-१९ वर्ल्डकप संघात स्थान मिळवल्यानंतर २०२२ च्या रणजी ट्रॉफी प्री-क्वार्टर फायनलमध्ये नागालँडविरुद्ध २६६ धावांची विक्रमी खेळी करत वयाच्या १७ व्या वर्षी सर्वात मोठी खेळी करण्याचा पराक्रम केला होता, तसेच २०२३ च्या देवधर ट्रॉफीत सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना २२७ धावा कुटल्या होत्या आणि त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आयपीएल २०२६ साठी गुजरात टायटन्सने त्याला ६५ लाख रुपयांत रिटेन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group