ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेशशेठ बोराटे युवा मंचाची सामाजिक बांधिलकी!

४५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवाभावी उपक्रमांतर्गत निलेशशेठ बोराटे युवा मंच तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समिती सभापती सौ. सुजाताताई निलेश बोराटे यांच्या वतीने खेड तालुक्यातील भोरगिरी, पाभे, भोबळे आणि बिव्हे या चार गावांमधील ४५० गरजू आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदत किटचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता दुर्गम भागातील गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण करण्याचा संवेदनशील प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

आमदार महेशदादा लांडगे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दुर्गम आणि आदिवासीबहुल गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देत गरजू कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक साहित्य पोहोचविण्यात आले. चार गावांतील तब्बल ४५० कुटुंबांना मदतीचा आधार मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

हेही वाचा –  धाराशिवच्या साडेतीन लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्याचे २२७ कोटी रुपये मिळणार; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

महेशदादांना उदंड आयुष्य लाभो; ग्रामस्थांकडून कृतज्ञता व्यक्त!

या मदतकार्यामुळे भारावलेल्या आदिवासी कुटुंबांनी आमदार महेशदादा लांडगे यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे केल्याबद्दल निलेश बोराटे आणि विधी समिती सभापती सुजाता निलेश बोराटे यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. वाढदिवसानिमित्त मिळालेली ही मदत आमच्यासाठी मोठा आधार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“आमचे मार्गदर्शक नेते आमदार महेशदादा लांडगे यांचा वाढदिवस म्हणजे समाजातील गरजू आणि वंचित घटकांसाठी काहीतरी करण्याची संधी आहे. महेशदादा नेहमीच सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपण्याचा विचार मांडतात. त्यांच्याच विचारांतून प्रेरणा घेऊन निलेशशेठ बोराटे युवा मंचाच्या माध्यमातून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ४५० कुटुंबांना मदत करता आली, याचे मनस्वी समाधान आहे. समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान निर्माण करण्यासाठी यापुढेही आम्ही सातत्याने कार्यरत राहू.”

– सुजाता निलेश बोराटे, सभापती, विधी समिती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group