Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! अवघ्या २ दिवसांत केली ११५ कोटींची कमाई

Drishyam 3 Collection | बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगणचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सस्पेन्स-थ्रिलर ‘दृश्यम ३’ २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ आणले आहे. या फ्रँचायझीचा हा तिसरा व अखेरचा भाग असून, यात अजय देवगण विरुद्ध जयदीप अहलावत यांच्यातील अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रदर्शित होताच पहिल्या दोन दिवसांतच चित्रपटाने भारतात तब्बल ११५.५० कोटींची विक्रमी कमाई केली आहे.

२ ऑक्टोबरच्या सुट्टीसह सुरू झालेल्या लाँग वीकेंडचा चित्रपटाला मोठा फायदा मिळाला आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये चित्रपटाला हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळत आहे. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ६२ कोटींची धमाकेदार ओपनिंग घेतली होती, तर शनिवारी ५३.५० कोटींची भर घालत भारतातील नेट कलेक्शन ११५.५० कोटींवर नेले. याशिवाय चित्रपटाने जगभरात (Worldwide Gross) १७७.१० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाचे एकूण बजेट ११० ते १३० कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात असून, अवघ्या ४८ तासांत चित्रपटाने आपले संपूर्ण बजेट वसूल केले आहे.

हेही वाचा

रशियाचा युक्रेनवर भीषण ड्रोन हल्ला; भारतीय कंपनीचा औषध प्रकल्प उद्ध्वस्त

सलमान खानच्या ‘सिकंदर’चा मोडला रेकॉर्ड

विशेष म्हणजे, ‘दृश्यम ३’ने अवघ्या दोन दिवसांत सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचा (११०.३६ कोटी) भारतातील कमाईचा विक्रम मोडीत काढला आहे. या चित्रपटात अजय देवगणसह जयदीप अहलावत, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, प्रकाश राज, इशिता दत्ता, मृणाल जाधव, कमलेश सावंत आणि सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button