Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय धैर्याचा सन्मान; ‘मॅनकाइंड’कडून १ कोटी रुपयांचे इनाम

नवी दिल्ली | दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात कॉकपिटमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतरही असीम धैर्य दाखवत १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मच्छार यांच्या या अतुलनीय शौर्याची आणि समयसूचकतेची दखल घेत प्रसिद्ध औषध निर्माता कंपनी ‘मॅनकाइंड फार्मा’ने त्यांना १ कोटी रुपयांचे रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

मॅनकाइंड फार्माने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) एक निवेदन जारी करत कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याला सलाम केला आहे. कंपनीने म्हटले की, “स्मित मच्छार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले, हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे. त्यांनी वाचवलेले प्राण आणि दिलेली प्रेरणा याची तुलना पैशाने होऊ शकत नाही. केवळ शब्दांनी आभार न मानता कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहोत. त्यांनी संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.”

हेही वाचा

टीम इंडिया ‘चॅम्पियन’! फायनलमध्ये पाकिस्तानला नमवून जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक

हवेत ३४ हजार फुटांवर नेमकं काय घडलं?

‘फ्लायदुबई’च्या या विमानाने उड्डाण केल्यानंतर ३४ हजार फूट उंचीवर असताना कॉकपिटमध्ये अचानक सह-वैमानिकाने वैमानिकावर जीवघेणा चाकू हल्ला चढवला. विमानाचे संभाव्य अपहरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. या झटापटीदरम्यान विमान अवघ्या एका मिनिटात ३४ हजार फुटांवरून थेट १७ हजार फुटांपर्यंत खाली आले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. स्वतः गंभीर जखमी आणि रक्ताळलेल्या अवस्थेत असतानाही कॅप्टन स्मित मच्छार यांनी प्रसंगावधान राखत विमानावर नियंत्रण मिळवले आणि अखेर ते सौदी अरेबियामध्ये सुखरूप उतरवून १८० प्रवाशांचे प्राण वाचवले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button