Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

टीम इंडिया ‘चॅम्पियन’! फायनलमध्ये पाकिस्तानला नमवून जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक

Asian Games 2026 | आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय क्रिकेट संघांनी ऐतिहासिक कामगिरी करत क्रिकेट प्रकारात ‘डबल गोल्ड’वर नाव कोरले आहे. महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला नमवून सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघानेही अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने विजयासाठी दिलेल्या २१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १९२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. यासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अडखळती झाली होती. युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (१५) आणि संजू सॅमसन (२) स्वस्तात बाद झाले. मात्र, सलामीवीर अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत ६१ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला कर्णधार श्रेयस अय्यरने २१ आणि इशान किशनने २० धावांची साथ दिली. अखेरच्या षटकांमध्ये तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली. तिलकाने अवघ्या काही चेंडूंत नाबाद ५१ धावांची वादळी खेळी केली, तर शिवम दुबेने २१ धावांचे योगदान देत भारताला २० षटकांत २११ धावांचा डोंगर उभारून दिला.

हेही वाचा

पहिल्यांदाच गोल्फमध्ये ‘गोल्ड’! प्रणवी उर्सची आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली

२१२ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दडपण दिसून आले. साहिबजादा फरहान (१०), सदाकत (२३) आणि यष्टिरक्षक उस्मान खान (३) स्वस्तात बाद झाले. सॅम अयुबने २९ धावा केल्या, तर अखेरीस हसन नवाजने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला; मात्र भारताच्या अचूक माऱ्यापुढे पाकिस्तानला १९२ धावांवर समाधान मानावे लागले आणि भारताने २० धावांनी थरारक विजय मिळवला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button