ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘‘पुढारी मावळ गौरव’’ सन्मान सोहळा’ जल्लोषात साजरा

आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा सन्मान

वडगाव मावळ । प्रतिनिधी

मान्यवरांची उपस्थिती.. कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या टाळ्यांच्या कडकडाट.. वैशाली बँक्वेटमधील लखलखाट.. अशा उत्साही वातावरणात मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविलेल्या मान्यवरांचा ‘पुढारी मावळ गौरव सन्मान’ सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

​आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते; तसेच इतिहास अभ्यासक संदीप तापकीर, ‘पुढारी’चे पिंपरी-चिंचवड आवृत्तीप्रमुख किरण जोशी, वितरण विभाग प्रमुख विजय जाधव

​पुढारी मावळ गौरव पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :

संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील, संगीता सतीश खळदे, सागर निर्गुण बोडके, सिद्धार्थ गोरख दाभाडे, शिवाजी पवार, ॲड. नंदकुमार ज्ञानोबा काळोखे, दशरथ (नाना) अर्जुनराव बोरे, अनिरुद्ध काळोखे, अशोक कुटे, भिकाजी भगवंत, ॲड. दीपक वसंत चव्हाण, दीपक सोनवणे, ॲड. देविदास मराठे, किरण हुलावळे, डॉ. महेंद्र चव्हाण, पांडुरंग दत्तात्रय बांदल, सागर अशोक शहा, डॉ. सौरभ सतीश मेहता, शंकरगौडा हादीमनी, सुभाष धामणकर, सुभाष सूर्यवंशी, सुभाष डेनकर, सुनील दशरथ भोंगडे, विलास बबनराव काळोखे, विनायक गंगाराम भेगडे, डॉ. यशवंत वाघमारे.

हेही वाचा –  मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात दिनो मोरियाची EOWकडून चौकशी; प्रकरण नेमकं काय?

​’पुरस्कारार्थींचे कर्तृत्व समाजासाठी आदर्शवत’

पुढारी मावळ गौरव सन्मान सोहळ्यासाठी पात्र ठरलेल्या पुरस्कारार्थींनी मावळ तालुक्यातील सामाजिक राजकीय सहकार उद्योग शिक्षण अशा विविध क्षेत्रात वर्षानुवर्ष उल्लेखनीय कार्य करत आपले कर्तृत्व सिद्ध केले त्यामुळेच ते आज या सन्मान सोहळ्यातील पुरस्कारार्थी आहेत, अशा पुरस्कारार्थींचे कर्तृत्व समाजासाठी आदर्श ठरेल, असे गौरव उद्गार आमदार सुनील शेळके यांनी या पुरस्कार सोहळा प्रसंगी काढले. त्यांना आणखी काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात त्याबद्दल ‘पुढारी’चे विशेष आभार मानले.

​प्रसिद्ध इतिहास अभ्यासक संदीप तापकीर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे अनेक दाखले देत मावळ तालुक्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला उजाळा दिला. शिवकालीन काळापासून मावळच्या भूमीचे आणि मावळातील मावळ्यांचे असलेल्या योगदानाबद्दल त्यांनी विशेष माहिती या वेळी दिली. स्वागत व प्रास्ताविक किरण जोशी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण शेलार यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button