ताज्या घडामोडी

आष्टी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत चैतन्य मडकेची उल्लेखनीय कामगिरी

आष्टी | आष्टी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चैतन्य बाळासाहेब मडके याने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. आपल्या वेगवान आणि दमदार कामगिरीच्या जोरावर चैतन्यने स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत आपल्या क्रीडा कौशल्याची छाप उमटवली.

चैतन्यने यापूर्वीही विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होत त्याने द्वितीय क्रमांक पटकावला होता. तसेच अंबाजोगाई येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. याच स्पर्धेत भालाफेकमध्येही त्याने द्वितीय क्रमांक पटकावला होता. आता तालुकास्तरीय स्पर्धेत ४०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळवत त्याने आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

हेही वाचा

‘x’ विरुद्ध ‘मेटा’ वाद पुन्हा पेटला! “इन्स्टाग्राम मुलींसाठी” म्हणत एलॉन मस्क यांनी उडवली खिल्ली

नियमित सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर चैतन्यने हे यश मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन होत आहे. आगामी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही चैतन्यने अशीच दमदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

क्रीडा क्षेत्रातील त्याची यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहावी आणि भविष्यात त्याने मोठे यश संपादन करावे, यासाठी चैतन्यला सर्व स्तरांतून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button