Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

‘x’ विरुद्ध ‘मेटा’ वाद पुन्हा पेटला! “इन्स्टाग्राम मुलींसाठी” म्हणत एलॉन मस्क यांनी उडवली खिल्ली

Elon Musk | टेस्ला आणि ‘एक्स’चे (पूर्वीचे ट्विटर) सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी मार्क झुकरबर्ग यांच्या ‘मेटा’ कंपनीवर पुन्हा एकदा थेट निशाणा साधला आहे. “इन्स्टाग्राम हे मुलींसाठी आहे”, असे खळबळजनक विधान करत मस्क यांनी सोशल मीडियावर लिंगभेदाच्या रूढ कल्पनांवरून नव्या वादाला तोंड फोडले आहे. १ ऑक्टोबर रोजी व्हेंचर कॅपिटलिस्ट ‘गाइगर कॅपिटल’ यांच्या पोस्टला उत्तर देताना त्यांनी ही टिप्पणी केली. संबंधित पोस्टकर्त्याने इन्स्टाग्राम हे महिला-केंद्रित ॲप असल्याचे सांगत आपले खाते हटवल्याचे म्हटले होते, त्यावर मस्क यांनी ही सहमती दर्शवणारी प्रतिक्रिया दिली.

एलॉन मस्क यांनी इन्स्टाग्रामवर अशी टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मे महिन्यातही त्यांनी अशाच आशयाचे विधान केले होते. त्यावेळी त्यांनी काही पुरुष वापरकर्ते त्यांना इन्स्टाग्राम प्रोफाइलच्या लिंक्स पाठवतात यावरून त्यांची खिल्ली उडवली होती. त्यांच्या या ताज्या विधानानंतर नेटिझन्समध्ये दोन तट पडले असून काहींनी “एक्स मुलांसाठी आहे” म्हणत मस्क यांची पाठराखण केली, तर काहींनी “इन्स्टाग्राम हे सर्वांसाठी खुले, सर्वसमावेशक आणि सकारात्मक व्यासपीठ आहे” असे म्हणत मस्क यांच्यावर संकुचित विचारसरणीचा आरोप केला आहे.

हेही वाचा

निवडणूक आयोगाविरोधात ‘आप’ आक्रमक; सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

‘मेटा’ आणि ‘एक्स’मधील जुनी व्यावसायिक लढाई

मस्क यांची ही टिप्पणी ‘एक्स’ आणि ‘मेटा’मधील व्यावसायिक संघर्षाची पुढची कडी मानली जात आहे. जुलै २०२३ मध्ये मेटाने ‘थ्रेड्स’ हे टेक्स्ट-आधारित ॲप लाँच करून ‘एक्स’ला थेट आव्हान दिले होते. तेव्हापासून मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्यातील शाब्दिक चकमकी सातत्याने पाहायला मिळत आहेत. केवळ सोशल मीडियापुरतीच ही स्पर्धा मर्यादित नसून, मस्क यांची ‘एक्सएआय’ (xAI) आणि मेटा यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातही मोठी चुरस सुरू आहे. २०२५ मध्ये मस्क यांनी ‘एक्स’ आणि ‘एक्सएआय’चे एकत्रीकरण करून झुकरबर्ग यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button