ताज्या घडामोडीपुणे

चाकण नगर परिषदेत स्वच्छता कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी कार्यशाळा

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत प्रशिक्षण; कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

पुणे | चाकण नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ, सुरक्षित कार्यपद्धती आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेत स्वच्छता कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजातील शिस्त, स्वच्छता व्यवस्थापन, कचरा संकलन व वर्गीकरण, सार्वजनिक आरोग्य, कार्यस्थळी सुरक्षितता तसेच नागरिकांशी संवाद याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक पद्धतींचा अवलंब करून शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बाबींवरही प्रशिक्षण देण्यात आले.

हेही वाचा

“मीरा भाईंदर ही जैन नगरी अन् मिनी राजस्थान”; भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या विधानाने वाद पेटला

यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रशिक्षणातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. आपल्या दैनंदिन कामकाजात प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी योगदान देण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ‘स्वच्छ आणि सक्षम चाकण’ घडविण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या कौशल्यवृद्धीला प्रोत्साहन देणारे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प चाकण नगर परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button