Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा देशव्यापी संप अखेर स्थगित; रात्री उशिराच्या बैठकीत तोडगा

Bank Strike Called Off | देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (२८ सप्टेंबर) पुकारलेला तीन दिवसांचा देशव्यापी संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) २८, २९ आणि ३० सप्टेंबर या कालावधीत संपाची हाक दिली होती. मात्र, रविवारी रात्री उशिरा इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा संप आणि नियोजित आंदोलने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सलग तीन दिवस बँकिंग सेवा ठप्प होण्याचे संकट टळले असून महिनाअखेरीस ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रविवारी रात्री साडेनऊ वाजता ‘आयबीए’ आणि ‘यूएफबीयू’च्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा होऊन पुढील वाटाघाटींचा मार्ग निश्चित करण्यात आला. सध्या महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते. मात्र, आठवड्यातील पाच दिवस कामकाज आणि उर्वरित सर्व शनिवार सुट्टी घोषित करण्याच्या जुन्या मागणीवर विचार करण्यासाठी आयबीए आणि यूएफबीयूची एक उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष देविदास तुळजापूरकर यांनी दिली. ही समिती सर्व घटकांशी चर्चा करून ग्राहक व कर्मचारी या दोघांनाही मान्य होईल असा तोडगा काढणार आहे.

हेही वाचा

रीलस्टार दिव्या शिंदेला अटक! निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यावर ५ लाखांच्या खंडणीसाठी हल्ला केल्याचा आरोप

या बैठकीत चतुर्थ श्रेणी आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठी लागू असलेल्या कामगिरीशी निगडित प्रोत्साहन योजनेबाबतही (PLI) चर्चा झाली. कर्मचारी संघटनांच्या आक्षेपांचा विचार करून आवश्यक सुधारणांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यावर सहमती झाली. तसेच ८ मार्च २०२४ च्या वेतन करारातील प्रलंबित मुद्द्यांवरही तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याने युनियनने आंदोलन स्थगित केले.

ग्राहकांना महिनाअखेरीस दिलासा

संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी रविवार, २७ सप्टेंबर रोजीही सार्वजनिक क्षेत्रातील व प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, ऐनवेळी संप मागे घेतल्यामुळे धनादेश वटणावळ (चेक क्लिअरन्स), रोख देवाणघेवाण आणि इतर प्रत्यक्ष बँकिंग व्यवहार सुरळीत सुरू राहणार असून सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button