शालेय राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील 05 खेळाडूंची निवड

पिंपरी : दि.22 व 24 सप्टेंबर 2026 रोजी त्रिमूर्ती मंगल कार्यालय कर्जत रोड जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय वुशू क्रीडा स्पर्धेमध्ये राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य,व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील विद्यार्थी खेळाडूंनी 19 व 17 वर्ष मुले व मुलींच्या वयोगटात विविध वजनी गटात 05 सुवर्णपदक, 05 रौप्यपदक व 01 कांस्यपदक मिळवित उल्लेखनीय संपादन केलेले आहे.
निकाल-17 व 19 वर्षाखालील मुले व मुली-
1) प्रथम क्रमांक – कु. दिवाकर पांडे 11वी वाणिज्य (-48 किलोग्रॅम)
2) प्रथम क्रमांक – कु. चैत्राली लांडगे 11वी कला (-70किलोग्रॅम)
3) प्रथम क्रमांक – कु.कार्तिक जगताप 11वी कला (-52 किलोग्रॅम)
4) प्रथम क्रमांक – कु. सुमित कांबळे 11वी कला (-56किलोग्रॅम)
5) प्रथम क्रमांक -कु. पार्थ तांबेरे 12वी वाणिज्य (-80 किलोग्रॅम)
6) द्वितीय क्रमांक – कु. प्राची वाघमोडे 11वी कला (-52 किलोग्रॅम)
7) द्वितीय क्रमांक -कु. आदित्य चव्हाण 11वी कला (-48 किलोग्रॅम)
8) द्वितीय क्रमांक -कु. सदन अन्सारी 12वी वाणिज्य (-60 किलोग्रॅम)
9) द्वितीय क्रमांक -कु. शुभम जाधव 12वी कला (-70 किलोग्रॅम)
10) द्वितीय क्रमांक – कु.साईराज हळीकर (-52 किलोग्रॅम)
11) तृतीय क्रमांक – कु.अमित माने 11वी कला (-60 किलोग्रॅम)
हेही वाचा – नागपुरात अतिविशेष दंतचिकित्सा केंद्राचे काम वेगाने; तीन महिन्यांत लोकार्पणाचे फडणवीस यांचे निर्देश
यातील प्रथम क्रमांक प्राप्त 05 खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री अजित भाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीर मुंगसे सर,पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांतदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.





