UAEच्या नवनियुक्त राजदूतांची राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याशी सदिच्छा भेट
वैद्यकीय, पर्यटन, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा; भारत-UAE विमानसेवा विस्ताराबाबतही संवाद

मुंबई : संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील नवनियुक्त राजदूत अब्दुल्ला सैफ अल नुआइमी यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मुंबईतील लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय क्षेत्र, पर्यटन, शैक्षणिक सहकार्य, कृषी तसेच दोन्ही देशांतील नागरिकांमधील परस्पर संपर्क वाढविण्याच्या मुद्द्यांचा समावेश होता.
हेही वाचा – १ ऑक्टोबरपासून बदलणार अनेक नियम; LPG सबसिडी, UPI, NRI प्रॉपर्टीपासून बँकिंगपर्यंत मोठे बदल
भारत आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यान विमानसेवा अधिक विस्तारित करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. वाढत्या परस्पर संबंधांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील प्रवास आणि संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे.
या बैठकीला संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन अल् मर्झुकी तसेच दूतावासातील इतर अधिकारी उपस्थित होते.




