ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

चिंचवडच्या प्रतिभा महाविद्यालयात २९ सप्टेंबर रोजी ‘प्रतिभा जॉब फेअर २०२६’

५० हून अधिक कंपन्यांमध्ये १००० जागांवर रोजगाराची संधी

पिंपरी- चिंचवड | चिंचवड येथील नामांकित ‘प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस’च्या वतीने प्रतिभा महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य ‘प्रतिभा जॉब फेअर २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे एम्प्लॉयमेंट ऑफिस तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिभा ग्रुपचा हा ११ वा मेगा जॉब फेअर असून, यामध्ये राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय स्तरावरील ५० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात सुमारे १ हजारहून अधिक विविध पदांवर थेट नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी दिली.

हेही वाचा

“करार करा, नाहीतर इराण उद्ध्वस्त करू!”; UN मध्ये ट्रम्प यांचा थेट इशारा

विविध शाखांतील फ्रेशर्स व अनुभवींसाठी सुवर्णसंधी

या रोजगार मेळाव्यात फ्रेशर्ससह अनुभवी उमेदवारांनाही सहभागाची संधी आहे. बी.कॉम., बीबीए, बीसीए, बी.एस्सी., एम.कॉम., एमबीए, एमसीए, एम.एस्सी., बीई, बी.टेक., एमई, एम.टेक., अभियांत्रिकी डिप्लोमा, फार्मसी तसेच आयटीआय (ITI) अशा विविध शैक्षणिक पात्रताधारक तरुणांसाठी नामवंत कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

नोंदणी पूर्णपणे मोफत; संपर्क साधण्याचे आवाहन

या रोजगार मेळाव्यासाठी प्रवेश आणि नावनोंदणी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे. मात्र, मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी इच्छुकांनी ८६००१००९४२ (8600100942) या क्रमांकावर संपर्क साधणे अनिवार्य आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील जास्तीत जास्त पदवीधर व पदविकाधारक तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य आयोजक डॉ. दीपक शहा यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button