ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वर्गीय तात्या बापट स्मृती समितीच्या ‘भारत माता भवन’च्या वास्तुवृद्धीचा शुभारंभ; खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून ५० लाखांचा निधी

पिंपरी : चिंचवड येथील स्वर्गीय तात्या बापट स्मृती समिती संचलित ‘भारत माता भवन’च्या वास्तुवृद्धीचा (इमारतीवर दोन नवीन मजले) बांधण्याच्या कामाचा शुभारंभ खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभहस्ते रविवारी पार पडला. या वास्तूच्या विस्तारासाठी बारणे यांनी खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी दिला असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी देण्याची ग्वाहीदेखील खासदार बारणे यांनी या वेळी दिली.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक मुकुंदराव कुलकर्णी, प्रांत संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे, पिंपरी-चिंचवड शहर संघचालक विनोद बन्सल, संघ अधिकारी विनायकराव थोरात, महापालिकेच्या ‘ब’ प्रभागाचे अध्यक्ष मंदार देशपांडे, प्रकल्प आर्किटेक्ट उदय कुलकर्णी, जयदीप खापरे, रवी नामदे, उदय हळदीकर उपस्थित होते.

हेही वाचा –  शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तनिष्का शिंदेचे सुवर्णपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कार्यरत असलेल्या तात्या बापट स्मृती केंद्राचे कार्य अत्यंत उल्लेखनीय असल्याचे सांगत खासदार बारणे म्हणाले, ‘पूर्वांचल राज्यातील विद्यार्थ्यांना येथे आणून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले जातात. भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे मोठे कार्य या माध्यमातून होत आहे. देशाची अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासाठी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून मोलाचे योगदान देत आहे’.

‘या वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि राहण्याचा सर्व खर्च उचलून त्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील आदिवासी भाग आणि पूर्वांचल राज्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. त्याच धर्तीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील आदिवासी घटक आणि सामाजिक संस्थांना सातत्याने सहकार्य केले जात आहे. यापूर्वीही कर्जत तालुक्यातील आदिवासी भवनासाठी ५० लाखांचा निधी देण्यात आला होता, तसेच संस्थेला अ‍ॅम्ब्युलन्सदेखील उपलब्ध करून देण्यात आल्याचे’. खासदार बारणे यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button