“पुतीन यांना युद्ध संपवायचंय, पण झेलेन्स्की संघर्ष ताणत आहेत”; डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप

हेही वाचा
आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प यांनी युद्धाच्या जागतिक नुकसानावर बोट ठेवले. “रशियाच्या डिझेल शुद्धीकरणाचे अनेक कारखाने उद्ध्वस्त झाल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आहे. या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत असून दर महिन्याला सुमारे २५ हजार नागरिक आणि विशेषतः सैनिकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे हे थांबणे अत्यंत गरजेचे आहे,” असे ट्रम्प यांनी नमूद केले.
“न्यूयॉर्कमधील बैठक परिस्थिती बदलू शकते”; झेलेन्स्कींचा विश्वास
दुसरीकडे, ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेनंतरही युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. किव्ह भेटीबद्दल ट्रम्प यांचे आभार मानत झेलेन्स्की म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये पुढील बैठकीसाठी तयार झाले आहेत आणि ही आगामी चर्चा अनेक गोष्टी बदलू शकते. शांतता प्रस्थापित करणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून शस्त्रसंधी, ऊर्जा, अन्न सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षेवर सखोल चर्चा करण्यावर आमचा भर आहे.”





