TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात १ हजार रोजगार मेळावे; २,५०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग, युवकांसाठी मोठ्या संधी

२९ सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’; आतापर्यंत १,५८८ कंपन्यांची नोंदणी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी

मुंबई : राज्यातील युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी राज्यभरात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यांमध्ये २,५०० हून अधिक उद्योगसमूह सहभागी होण्याची अपेक्षा असून टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज यांसह अनेक नामांकित कंपन्यांकडून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अशी माहिती कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’साठी आतापर्यंत १ हजार ५८८ कंपन्यांनी नोंदणी केली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून ७१ हजार ९३९ प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. आगामी काळात आणखी कंपन्या आणि उद्योगसंस्था सहभागी होण्याची अपेक्षा असून २९ सप्टेंबरपर्यंत सहभागी कंपन्यांची संख्या २ हजार ५०० पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

या रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, एलआयसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सीएट यांसारख्या नामांकित कंपन्या व संस्थांचा सहभाग आहे.

हेही वाचा –  सिंधुदुर्गात भातपिकाच्या नुकसानीचा पालकमंत्र्यांकडून आढावा; बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदतीच्या सूचना

ऑटोमोबाईल, उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स यांसह विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदवी, डिप्लोमा, इंजिनीअरिंग तसेच विविध कौशल्याधारित पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी विविध पदांवर संधी उपलब्ध आहेत. तंत्रज्ञ, मशीन ऑपरेटर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक यांसह इतर पदांचाही यामध्ये समावेश आहे.

उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ आणि युवकांकडील कौशल्ये यांची सांगड घालण्याचा प्रयत्न या रोजगार महाकुंभातून करण्यात येत आहे. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button