Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेला मिळणार बळ; रिक्त पदांसह प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि आरोग्यसेवा उपलब्ध करण्यावर भर; गणेशोत्सवातील वाढती गर्दी लक्षात घेऊन नियोजन

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसह जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, रुग्णालयांतील पायाभूत सुविधा आणि अन्य आरोग्य सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रलंबित प्रश्न वेळ न दवडता मार्गी लावून कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांमधील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्यासह आरोग्य विभाग आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील आवश्यक एस-२३ आणि एस-२० विशेषज्ञांची रिक्त पदे भरण्यासह जिल्ह्यातील रुग्णालयांमधील वर्ग-१ ते वर्ग-४ संवर्गातील रिक्त पदांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्या ७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार रुग्णालयांसाठी आवश्यक अनुदान, बांधकामे आणि इतर प्रलंबित विषयांचाही आढावा घेण्यात आला.

हेही वाचा –  महाराष्ट्राला जागतिक इनोव्हेशन हब बनविण्याचा संकल्प; ‘टेक इन एशिया कॉन्फरन्स’मध्ये फडणवीसांचा संदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक नागरिकांसोबतच मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या आणखी वाढते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ आणि सर्व सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. उपलब्ध सुविधांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रम निश्चित करावा, अशा सूचना राणे यांनी दिल्या.

आरोग्य व्यवस्थेतील प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच नागरिकांना प्रभावी आणि समाधानकारक आरोग्यसेवा मिळेल, यासाठी समन्वयाने काम करावे, असेही मंत्री राणे यांनी निर्देशित केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button