Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्राला जागतिक इनोव्हेशन हब बनविण्याचा संकल्प; ‘टेक इन एशिया कॉन्फरन्स’मध्ये फडणवीसांचा संदेश

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट; स्टार्टअप्स, संशोधन, उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या एकत्रित परिसंस्थेवर भर

मुंबई : “नवोन्मेष करूया, इनक्युबेशनला चालना देऊया आणि एकत्रितपणे व्यापक परिणाम साधूया,” या संदेशातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या नवोन्मेषाधारित विकासाचा संकल्प जागतिक समुदायासमोर मांडला. सिंगापूर येथे आयोजित ‘टेक इन एशिया कॉन्फरन्स २०२६’मध्ये व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाची माहिती दिली.

आशियातील दोन हजारांहून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी, जागतिक नेते, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञानतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर या परिषदेत सहभागी झाले. यावेळी महाराष्ट्राच्या विकासाचा व्यापक दृष्टिकोन मांडताना फडणवीस यांनी राज्याची अर्थव्यवस्था ‘इनोव्हेशन लेड इकॉनॉमी’ म्हणून विकसित करण्यावर भर दिला.

स्टार्टअप्स, संशोधन संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि युवा नवोन्मेषक यांना सक्षम व सर्वसमावेशक परिसंस्थेत जोडून प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरील अग्रगण्य इनोव्हेशन हब बनविण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा; ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश

स्टार्टअप परिसंस्थेची माहिती

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी परिषदेत उद्घाटनपर मुख्य भाषण केले. त्यांनी महाराष्ट्रातील सक्षम स्टार्टअप परिसंस्था, युवा नवउद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, इनक्युबेशन सुविधा, डीप-टेक क्षेत्रातील संधी आणि राज्यातील स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याच्या धोरणाची माहिती दिली.

महाराष्ट्र आणि आशियातील विविध देशांनी परस्पर सहकार्याच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना द्यावी, इनक्युबेशन परिसंस्था अधिक मजबूत करावी आणि त्यातून सामाजिक व आर्थिक परिणाम साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

AI, सायबर सुरक्षा आणि डीप-टेकवर भर

भारताची ‘स्टार्टअप कॅपिटल’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, डीपफेक प्रतिबंधक तंत्रज्ञान, फिनटेक, क्लीनटेक, रोबोटिक्स आणि अन्य उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये राज्याचे स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यात स्टार्टअप्स, नवोन्मेष, प्रगत तंत्रज्ञान, इनक्युबेशन, गुंतवणूक, संशोधन आणि जागतिक बाजारपेठांशी जोडणी या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group