Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

महिला आशिया चषकाची फायनल ठरली! सलग तिसऱ्यांदा भिडणार भारत-श्रीलंका

Womens Asia Cup 2026 Final | महिला टी-२० आशिया चषक २०२६ स्पर्धेचे दोन्ही अंतिम फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा धुव्वा उडवल्यानंतर, दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानवर ४ गडी राखून मात करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासह पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून, आता जेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सलग तिसऱ्यांदा हायव्होल्टेज महामुकाबला रंगणार आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या महिला संघाला २० षटकांत ५ बाद १३० धावांपर्यंतच मजल मारता आली. विजयासाठी मिळालेले १३१ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने १८.४ षटकांत ६ गडी गमावून सहज पूर्ण केले आणि पाकिस्तानला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.

अंतिम सामना कधी, कुठे आणि किती वाजता रंगणार?

तारीख: रविवार, १३ सप्टेंबर २०२६

ठिकाण: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

हेही वाचा

महापौर रवि लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ५७ हजार विद्यार्थ्यांची शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम

वेळ: भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८:०० वाजता (नाणेफेक संध्याकाळी ७:३० वाजता)

थेट प्रक्षेपण (Live Telecast): सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर (Sony Sports Network) टीव्हीवर थेट प्रक्षेपण पाहता येईल, तर मोबाईलवर ‘सोनी लिव्ह’ (SonyLIV) ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

सलग तिसऱ्यांदा आमनेसामने; भारताकडे बदला घेण्याची संधी

महिला आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका सलग तिसऱ्यांदा समोरासमोर येत आहेत. २०२२ च्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला नमवून चषक उंचावला होता, तर २०२४ च्या दंबुला येथील अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा ८ गडी राखून पराभव करत जेतेपद पटकावले होते. आता हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाकडे त्या पराभवाची परतफेड करत विक्रमी आठव्यांदा (टी-२० फॉरमॅटमध्ये चौथ्यांदा) आशिया चषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button