‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ अखेर ओटीटीवर रिलीज! घरबसल्या ‘या’ प्लॅटफॉर्म्सवर पाहा चित्रपट

Spider Man- Brand New Day OTT | हॉलीवूड सुपरस्टार टॉम हॉलंड आणि झेंडया यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ (Spider-Man: Brand New Day) या चित्रपटाची ओटीटी रिलीजबाबतची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींची विक्रमी कमाई केल्यानंतर हा बहुचर्चित चित्रपट ६ ऑक्टोबरपासून प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिजिटल खरेदी (Buy) आणि भाडेतत्त्वावर (Rent) उपलब्ध झाला आहे.
सोनी पिक्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट ‘प्रीमियम व्हिडिओ ऑन डिमांड’ (PVOD) स्वरूपात रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षक Apple TV, ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ, Fandango आणि Sony Pictures Core या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर हा चित्रपट रेंट किंवा खरेदी करून पाहू शकतील. अमेरिकेत प्राईम व्हिडीओ आणि ऍपल टीव्हीवर हा चित्रपट खरेदी करण्यासाठी २९.९९ डॉलर, तर २४.९९ डॉलर रेंटसाठी आकारले जात आहेत. विशेष म्हणजे, प्राईम व्हिडीओवर चित्रपट रेंट करण्यासाठी कोणत्याही स्वतंत्र सबस्क्रिप्शन मेंबरशीपची आवश्यकता नाही.
हेही वाचा
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी ‘इंडिया’ आघाडी आक्रमक; राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात
सध्या हा चित्रपट केवळ डिजिटल रेंटसाठी उपलब्ध असून नेटफ्लिक्सवरील स्ट्रीमिंगची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सोनी पिक्चर्स आणि नेटफ्लिक्स यांच्यातील विशेष करारानुसार हा चित्रपट भविष्यात नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सोनीच्या थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या तसेच मार्वलच्या चित्रपटांसाठी नेटफ्लिक्स हा पहिला सबस्क्रिप्शन स्ट्रीमिंग पार्टनर असल्याने आगामी काळात नेटफ्लिक्स युजर्सना हा चित्रपट मोफत पाहता येणार आहे.
बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई
सुमारे २,३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात २३,४८०.६० कोटी रुपयांचे भव्य ग्रॉस कलेक्शन केले होते. एकट्या भारतात या चित्रपटाने तब्बल ५००.५८ कोटी रुपयांचा गल्ला जमवून इतिहास रचला होता. आता थिएटरनंतर घरबसल्या ओटीटीवर या चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.





