Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

नायझेरियामध्ये भीषण विमान अपघात! हवाई दल प्रमुखांसह ३२ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Nigeria Plane Crash | पश्चिम आफ्रिकेतील नायझेरियामध्ये एक अत्यंत भीषण विमान दुर्घटना घडली आहे. नायजेरियन हवाई दलाचे (Nigerian Air Force) प्रवासी विमान कोसळून हवाई दल प्रमुख एअर मार्शल संडे केल्विन अनेके यांच्यासह तब्बल ३२ जणांचा जागीच मृत्यू झाला. अलिकडच्या वर्षांतील ही सर्वात मोठी हवाई दुर्घटना मानली जात असून, या पार्श्वभूमीवर नायझेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी देशभरात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

नायझेरियाच्या दक्षिणेकडील बेनिन सिटी येथून लागोस या आर्थिक केंद्राकडे नियमित मोहिमेवर निघालेले एटीआर-४२ (ATR-42) हे दोन इंजिनांचे टर्बोप्रॉप विमान सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास (०८०० जीएमटी) नैऋत्य ओंडो राज्यातील इग्बोकोडा येथे नौदल तळाजवळ कोसळले. या विमानात २५ प्रवासी आणि ७ क्रू मेंबर्स (कर्मचारी) असे एकूण ३२ जण होते. या दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व ३२ जणांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर नदीकाठी बचाव पथकांकडून शोधमोहीम राबवली जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

हेही वाचा

‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ अखेर ओटीटीवर रिलीज! घरबसल्या ‘या’ प्लॅटफॉर्म्सवर पाहा चित्रपट

सखोल चौकशीचे आदेश, ३ दिवसांचा दुखवटा

या भीषण दुर्घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने निवेदन जारी करत मृतांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र शोक व्यक्त केला आहे. सशस्त्र दल आणि संपूर्ण राष्ट्रासाठी हा अत्यंत दुःखाचा प्रसंग असल्याचे सांगत राष्ट्राध्यक्षांनी पुढील तीन दिवस देशभरात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या अपघाताच्या तांत्रिक व मूळ कारणांची तातडीने उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्याचे आदेश नायजेरियन हवाई दलाला दिले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button