ताज्या घडामोडीBreaking-newsमनोरंजन

‘हनुमान अंश’च्या सिक्वेलमध्ये विराट कोहली अन् अनुष्का शर्मा झळकणार?

Hanuman Ansh | आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले असून हा चित्रपट लवकरच २०० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार करणार आहे. या ऐतिहासिक यशानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आनंदाची बातमी दिली असून या चित्रपटाचे आणखी दोन भाग (सिक्वेल) येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, आगामी भागांमध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक जागतिक सेलिब्रिटींच्या पाहुण्या कलाकाराच्या (कॅमिओ) भूमिका पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

सह-निर्मात्या नम्रता सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट सुरुवातीपासूनच तीन भागांची ‘ट्रायलॉजी’ म्हणून नियोजित करण्यात आला होता. पहिल्या भागात नीम करोली बाबांचा सुरुवातीचा प्रवास, उत्तराखंडमधील कैंची धाम आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास दाखवला आहे. पुढील सिक्वेलचे लेखन ९० दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरू केले जाईल, कारण संपूर्ण टीम दीड वर्षांपासून अहोरात्र काम करत आहे.

हेही वाचा

उपमुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतला तयारीचा आढावा

नम्रता सिंग यांनी स्पष्ट केले की, चित्रपटाचा तिसरा भाग प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आधारित असेल. नीम करोली बाबांच्या आध्यात्मिक विचारांनी भारताची ओळख जगभरात कशी पोहोचवली आणि पाश्चात्त्य जगताला कसे आकर्षित केले, हे यात मांडले जाईल. ॲपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स, मेटाचे मार्क झुकरबर्ग, ट्विटरचे संस्थापक जॅक डॉर्सी तसेच हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स यांच्यावर बाबांचा प्रभाव कसा पडला, याचा प्रवास तिसऱ्या भागात दाखवला जाईल.

विराट-अनुष्कासह बड्या व्यक्तींशी संपर्क

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे नीम करोली बाबांचे निस्सीम भक्त म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आगामी भागांत या सेलिब्रिटींची आश्रमातील भेट आणि श्रद्धा पडद्यावर आणण्यासाठी निर्मात्यांनी त्यांच्याशी आणि काही आंतरराष्ट्रीय व्यक्तींशी संपर्क साधला आहे. या सेलिब्रिटींना आधीपासूनच या प्रकल्पाविषयी माहिती असून लवकरच त्यांच्या सहभागावर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group