Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भंडारा जिल्ह्यात ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; ८ मजुरांचा जागीच मृत्यू, ४ गंभीर

भंडारा | पोळ्याच्या पाडव्याची पहाट भंडारा जिल्ह्यासाठी काळरात्र ठरली असून, नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आठ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव (सडक) परिसरातील भाऊ ढाब्याजवळ भरधाव पिकअपने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने ही काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. अपघातातील सर्व मृत व जखमी छत्तीसगडमधील मजूर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गालगतच्या पेट्रोल पंपावरून इंधन भरून एक ट्रक नागपूरच्या दिशेने जात होता. त्याच दरम्यान मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअपने ट्रकला मागून भीषण धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. पिकअपमध्ये ११ ते १२ मजूर प्रवास करत होते, त्यापैकी ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा

विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा धडा

जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. वाहनात अडकलेल्या मजुरांना मोठ्या शर्थीने बाहेर काढण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चार जणांना तातडीने भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रोजीरोटीच्या शोधात निघालेल्या गरीब मजुरांवर सणाच्याच दिवशी काळाने घाला घातल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी महामार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button