पिंपरी / चिंचवडताज्या घडामोडी

प्रियदर्शनी स्कूल, मोशीच्या विद्यार्थिनीचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय यश

पिंपरी : प्रियदर्शनी स्कूल, मोशीच्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी राजसी पाठक हिने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत काता प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत तसेच कुमिते प्रकारात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी तळवडे हॉल, चिखली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राजसीने ७ वर्षे वयोगटातील मुलींच्या २० किलो वजनगटात उत्कृष्ट कामगिरी केली.तिच्या खेळातील जिद्द, आत्मविश्वास, चपळता आणि कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
लहान वयात मिळवलेले हे यश तिच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे द्योतक आहे.राजस्वीच्या या यशामागे तिच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले.

हेही वाचा –  महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला मोठी चालना; स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योगांत अब्जावधींच्या गुंतवणुकीची घोषणा

तिच्या शानदार कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक व क्रीडा विभागाने तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
राजसीची ही कामगिरी शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.

राजसीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त, प्राचार्य, शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग व पालकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button