ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा धडा

मानवी साखळीतून नागरिकांमध्ये जनजागृती

पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक ५ येथील एसपीजी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजआळंदी रोड, भोसरी येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश प्रतिमा तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच मानवी साखळीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करत हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.

महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा ७.० तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

हेही वाचा

प्रोटीन पावडरमध्ये अळ्या आढळल्याचा बिपाशा बासूचा दावा; तुकाराम मुंढेंना टॅग करत कारवाईची मागणी

मानवी साखळीच्या माध्यमातून जनजागृती:

गणेशोत्सवात प्लास्टिकचा वापर टाळावा, नैसर्गिक व पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य द्यावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी हरित शिक्षक शपथ घेण्यात आली तसेच स्वच्छतेच्या घोषणांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

“गणेशोत्सवाची भक्ती आणि उत्साह कायम ठेवत पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव निर्माण झाल्यास हा संदेश कुटुंब आणि समाजापर्यंत पोहोचतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा,” असे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button