TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा आंदोलकांनी गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला; आरक्षणावर आमदारांनी जाहीर केली भूमिका

“SEBC आणि कुणबी आरक्षणाला कायम पाठिंबा”; खाडाखोड केलेला कुणबी दाखला रद्दच होणार, पडळकरांचे स्पष्टीकरण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून, आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर-रत्नागिरी महामार्गावर कामती येथे मराठा आंदोलकांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा ताफा अडवला.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी आंदोलकांनी पडळकर यांच्याकडे केली. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर केली.

‘SEBC आणि कुणबी आरक्षणाला कायम पाठिंबा’

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी “मराठा समाजाच्या SEBC आणि कुणबी आरक्षणाला आमचा कायम पाठिंबा आहे,” अशी भूमिका मांडली. मात्र, खाडाखोड केलेला कुणबी दाखला रद्दच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पडळकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवल्यानंतर उपस्थित मराठा आंदोलकांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा –  “१२ तारखेनंतर गंभीर परिणाम होतील”; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा

जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान लाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी पाणी प्यायले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी सरकारला दोन दिवसांचा वेळ दिला असून उपोषण सोडण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलकांकडून नेत्यांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जात असून, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानंतर कामती येथील आंदोलनाची चर्चा रंगली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button